" मिशन उडान " ने घेतली वक्तृत्वाची भरारी...
अकोला पोलीस लॉन येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होते, अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या विषया अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन अ आणि ब गटात ही स्पर्धा पार पडली प्रथम गट पाच ते दहा या गटामध्ये प्रथम पारितोषिक वत्सल प्रमोद डेहनकर (प्रभात किड्स स्कूल अकोला) यांनी पटकाविला, द्वितीय क्रमांक फातिमा आरुष मोहम्मद रसिक यांनी फटकाविला, तसेच तृतीय क्रमांक अनन्या आशिष सुरवाडे (श्री बालाजी इंग्लिश प्राइमरी स्कूल वाडेगाव) यांनी फटकाविला याचबरोबर प्रोत्साहन पर दोन पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये प्रथम साक्षी अशोक कोकाटे (श्री शिवाजी विद्यालय अकोट) आणि द्वितीय सोयरा अतुल अंधारे यांनी पटकाविला तसेच वरिष्ठ गटामध्ये प्रथम पारितोषिक आदित्य डोळे (आरडीजी महाविद्यालय अकोला) यांनी पटकाविला तसेच द्वितीय शेख उमायरा अन्सार अहमद यांनी फटकाविला तसेच तृतीय नारायणी अजय शास्त्री यांनी पटकाविला... अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली... परीक्षक म्हणून लाभलेले Adv सचिन माहोकार, प्राध्यापक स्वप्निल इंगोले, प्राध्यापक मेघराज गाडगे, प्राध्यापक निलेश पाकदुने या परीक्षकांच्या अंतर्गत ही स्पर्धा पार पडली आयोजन समितीमध्ये डॉक्टर रामेश्वर बरगट, शेखर साबळे, सुशांत निलखन यांनी स्पर्धेची जबाबदारी पार पाडली... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार, श्री गोपाल मुकुंदे, श्री शेखर साबळे,आणि आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांनी मानले, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली...